नमस्कार! iOS 18 सॉफ्टवेअर अपडेटने Appleच्या उपकरणांना एक नवीन दिशा दिली आहे. या ब्लॉगमध्ये, आम्ही iOS 18 मध्ये आलेल्या नवीन फीचर्स, सुधारणा आणि खास बदलांचा सखोल आढावा घेऊ. iOS 18 च्या अद्वितीय वैशिष्ट्यांसह तुमच्या Apple उपकरणांना अधिक कार्यक्षम आणि आधुनिक बनवण्याची माहिती तुम्हाला येथे मिळेल. चला, पाहूया iOS 18 मध्ये काय खास आहे!

नवीन iOS 18 वॉलपेपर/Wallpaper
iOS 18 च्या प्रत्येक नवीन Update सोबत एक नवीन Wallpaper समाविष्ट केला जातो. या आवृत्तीत, Apple ने एक नवीन डायनॅमिक Wallpaper दिला आहे जो दिवसभर बदलतो. ज्यांना स्थिर वॉलपेपर आवडतो, त्यांच्या साठी चार विविध रंगांचे पर्याय आहेत: पिवळा, गुलाबी किंवा रंगीत.

Flexible ॲप आणि विजेट प्लेसमेंट
iOS इतिहासात पहिल्यांदाच, तुम्ही होम स्क्रीनच्या ग्रिडवर App आणि widget कुठेही ठेऊ शकता. चिन्हांमध्ये अंतर ठेवू शकता किंवा विविध भागात ठेऊन वॉलपेपर दाखवू शकता. Android Users याआधीच या सुविधांचा आनंद घेत आहेत.

विजेट्सचा आकार बदलणे
iOS ने आत्तापर्यंत विविध आकारांचे Widget दिले आहेत, पण आतापर्यंत होम स्क्रीनवर ठेवलेल्या विजेट्सचा आकार बदलता येत नव्हता. iOS 18 मध्ये, Apple ने दोन नवीन पर्याय दिले आहेत:
- ड्रॅग हँडलचा वापर: Edit मोडमध्ये असताना विजेटच्या तळाशी उजव्या कोपऱ्यात असलेल्या ड्रॅग हँडलचा वापर करून तुमच्या विजेटचा आकार वाढवू किंवा कमी करू शकता, जर विविध आकार उपलब्ध असतील.
- Long press करून आकार बदलणे: विजेटवर Long press करून त्याच्या आकाराचे चिन्ह टॅप करून तुम्ही विजेटचा आकार बदलू शकता.

Home Screen कस्टमायझिंग
Edit मोडमध्ये असताना, होम स्क्रीनच्या तळाशी उजव्या कोपऱ्यातील edit बटणावर टॅप केल्यावर तुम्हाला नवीन ‘customize’ पर्याय दिसेल. हा पर्याय तुम्हाला होम स्क्रीनवरील ॲप चिन्हे आणि काही प्रमाणात वॉलपेपर बदलण्याची सुविधा देतो.
येथे तुम्ही:
- लाइट आणि डार्क Icons मध्ये स्विच करू शकता.
- वॉलपेपरचा रंग बदलू शकता.

Apps लॉक करणे आणि लपवणे
iOS 18 मध्ये, तुम्ही आता प्रत्येक अॅप्सला Face ID किंवा पासकोडने लॉक करू शकता. अॅप लॉक करण्यासाठी, अॅप Icon Long preas करा आणि “Require Face ID” निवडा. एकदा Face ID ने ओळखल्यावर, अॅप लॉक होईल आणि प्रत्येक वेळी उघडताना Identification आवश्यक असेल. लॉक केलेले अॅप्स नोटिफिकेशन previews किंवा Spotlight सर्च मध्ये दिसणार नाहीत, आणि सर्व अॅप्स, जसे की Settings आणि Maps, लॉक करता येणार नाहीत.
लॉक करण्यासोबतच, iOS 18 तुम्हाला अॅप्स लपवण्याची सुविधा देखील देते. लपवलेले अॅप्स लॉक केलेले अॅप्सप्रमाणेच काम करतात पण ते iOS App Library मध्ये नवीन Hidden वर्गात लपवले जातात. अॅप लपवण्यासाठी, त्याच्या चिन्हावर दीर्घ दाबा आणि “Require Face ID → Hide and Require Face ID” निवडा. फक्त App Store वरून डाउनलोड केलेले अॅप्स लपवता येतात.
लपवलेले अॅप्स Hidden Library मध्ये जाऊन Face ID ने Verify करून दिसू शकतात. लपवलेले अॅप्स नोटिफिकेशन्स, कॉल्स, किंवा महत्वाच्या अलर्ट्स प्राप्त करणार नाहीत, पण Settings सारख्या ठिकाणी ते दिसू शकतात.
अशाप्रकारे Apple ने 9 सप्टेंबर रोजी जाहीर केले की iOS 18 अपडेट, 16 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या iPhones साठी नवीन अपडेटसाठी तयार राहा. iOS 18 अपडेट तुम्हाला अनेक नवीन आणि छान फीचर्स देईल.
या अपडेटमध्ये तुम्हाला काय मिळणार? iOS 18 तुमच्या iPhone अनुभवाला सुधारण्यासाठी अनेक नवीन फिचर्स देईल. तुम्ही होम स्क्रीनवरील अॅप्स आणि विजेट्सचे rearrange करणे, कस्टमाईज्ड मेल नोटिफिकेशन्स मिळवणे, असे अनेक पर्याय मिळवू शकता.
धन्यवाद.

Leave a comment